निरा कन्या विद्यालयांमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा!

 






निरा कन्या विद्यालयांमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा!

 रिपब्लिकन भारतदिनांक 15/06/2026

पुरंदर तालुक्यातील निरा येथील सौ . लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यामंदिर येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी 'शाळा प्रवेशोत्सव' अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम 2025 - 26 मध्ये इयत्ता दहावी मध्ये आणि स्पर्धा परीक्षेत विशेष कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनी तसेच इयत्ता पाचवी ते नववी मध्ये नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची गतवर्षी विद्यालयाने मिळवलेल्या विशेष पुरस्कारांतर्गत सन्मानचिन्हांसह ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर इयत्ता पाचवी ते नववीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनींचे औक्षण करून गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.याचवेळी विद्यार्थिनींना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सल्लागार समिती सदस्य लक्ष्मणदादा चव्हाण, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या समन्वय समितीचे सदस्य दत्ताची आबा चव्हाण,स्कूल कमिटी सदस्य रेखाताई चव्हाण, संतोष गांधी,आदेश गिरमे, स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समिती सदस्य तनुजा शहा रामदास राऊत, शांतीलाल कोठडीया, विजय पवार, माणिक मस्के उपस्थित होते.

यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल दत्ताजी आबा चव्हाण यांचा सत्कार विद्यालयामार्फत घेण्यात आला . विद्यालयास प्राप्त झालेले कर्मवीर पारितोषिक , गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दलचे सन्मान चिन्ह आणि नऊ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाची निवड झाल्याबद्दल मिळालेली सन्मान चिन्ह या तीनही सन्मानचिन्हे याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने व पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे तसेच सर्व शिक्षक वृंदांनी स्वीकारले .

त्यानंतर इयत्ता दहावी मध्ये प्रथम 3 क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी अनुक्रमे वैभवी भुजबळ, आदिती वावरे, प्रांजल गार्डी, ईश्वरी मानमोडे तर १०वी ब मधील अर्पिता जाधव, प्राजक्ता मोटे, मुस्कान बागवान तसेच 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनी तनया तातुसकर, आलिया पठाण, हर्षदा पवार, धायगुडे समीक्षा आणि विशेष कौतुक म्हणून वाघमोडे शिवांजली व तनुजा जाधव या विद्यार्थिनींचा सत्कार घेण्यात आला .

एन एम एम एस या परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक निसर्गा तांबे तसेच आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विद्यार्थीनी सारा शहा, जेधे सिद्धी, निसर्गा तांबे आणि पाचवीमध्ये राजवी पोकळे, सुखदा गेंड, स्वरा केसकरयांचा सत्कार घेण्यात आला. त्याच बरोबर इयत्ता पाचवी ते नववी मध्ये सर्व विद्यालयांमध्ये अव्वल आलेली विद्यार्थिनी सारा शहा हिचा सत्कार घेण्यात आला .

त्यानंतर इयत्ता नववी मध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींना रामदास राऊत यांच्याकडून इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकांचे तीन सेट देण्यात आले. विद्यालयाने तयार केलेल्या शाखा माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे यांनी मानले .कार्यक्रमाला नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमधील शाळेविषयीची भीती कमी व्हावी आणि त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, हाच हेतू या कार्यक्रमांमध्ये असल्याचं विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी यावेळी सांगितलं. सर्व विद्यार्थ्यांना गोडाचा शिरा देवून शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका माया गायकवाड आणि अश्विनी खोपे यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments