रिपब्लिकन भारतदिनांक :21/06/2026
निरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहावे यासाठी विद्यालयांमध्ये हा उपक्रम आयोजित केल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी सांगितले.सर्वप्रथम विद्यालयाच्या उपशिक्षिका माया गायकवाड यांनी योग दिनाचे महत्त्व तसेच यावर्षीची थीम " निरोगी वृद्धवासाठी योग'' हिचा अर्थ स्पष्ट केला.त्यानंतर शहा कन्या विद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थिनींनी क्लॅप योग नृत्याचे एकत्रित सादरीकरण केले.त्यानंतर राष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये 10 सुवर्णपदक पटकावणारे योग शिक्षक सुधीर साळवे यांनी सर्वप्रथम विद्यार्थीनींना योगाचे महत्त्व तसेच योगाच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले . विद्यार्थिनींकडून विविध सूक्ष्म हालचाली, उभे राहून करावयाचे योगा प्रकार, बसून करावयाचे योगा प्रकार, सूर्यनमस्कार तसे प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक त्यांच्या उपयोगासह करून दाखविले. सुमारे 500 विद्यार्थीनींनी शिक्षकांसमवेत योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेतला.विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे यांनी सर्व विद्यार्थीनींना रोज योगाचा सराव करण्याचे आवाहन केले.विद्यालयाच्या उपशिक्षिका शिवाई मधे यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यालयाच्या उपशिक्षिका माया गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विद्यालयाच्या उपशिक्षिका राजश्री चव्हाण, मयुरी भिसे यांनी सुंदर फलक लेखन केले तर कुणाल खैरकार, शितल फरगडे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली .सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .





0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!