निरा शहर व पंचक्रोशी पावसाची दमदार हजेरी; नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा...

 

निरा शहर व  पंचक्रोशी पावसाची दमदार हजेरी; नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा......

 रिपब्लिकन भारत दिनांक 24/06/ 2026

​निरा/प्रतिनिधी

निरा शहर आणि परिसरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​उकाड्याच्या तीव्रतेमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमालीची घटली होती. मात्र, आज झालेल्या या पावसामुळे वातावरणात छान गारवा आलाआहे. हवामान बदलामुळे बाजारपेठेत पुन्हा चैतन्य निर्माण होऊन आगामी दिवसांत व्यापाऱ्यांचा व्यवसाय सकारात्मक गतीने वाढेल, असा विश्वास व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

​दुसरीकडे, या दमदार पावसामुळे शेती पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकरी राजा कमालीचा सुखावला आहे. या एकाच पावसाने नागरिक, शेतकरी आणि व्यापारी या तिन्ही घटकांमध्ये आनंदाचे आणि आशेचे वातावरण निर्माण केले आहे.

Post a Comment

0 Comments