जेजुरी(निरा )पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने त्यांचा धडाक्यात सत्कार करण्यात आला.....
रिपब्लिकन भारत दिनांक :30/06/2026
जेजुरी /प्रतिनिधी
यावेळी आरपीआयचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक पाटील यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथखंड देऊन त्यांचा आगळावेगळा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जेजुरी व निरा पंचक्रोशी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू,अशी ग्वाही यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली व उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले.या प्रसंगी आरपीआयचे इतरही अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!