रिपब्लिकन भारत दिनांक :3/07/2026
निरा/प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा येथील सौ . लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केलेले आहे .माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 45 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या . यातील दहा विद्यार्थिनी या परीक्षेमध्ये पात्र ठरल्या होत्या . दिनांक २ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये सारा शहा हिने 222 गुण मिळवून 434 वा क्रमांक तर सिद्धी जेधे हिने 214 गुण मिळवून 548 वा क्रमांक प्राप्त केला आहे .
सदर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने, पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे तसेच विद्यालयातील स्कॉलरशिप विभाग प्रमुख मयुरी भिसे तसेच विषय शिक्षक किरण शेटे, कुणाल खैरकार, अश्विनी सावंत या शिक्षकांनी मार्गदर्शन केले .
यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विशेष शिक्षकांचे विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी , मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक सर्व शिक्षक यांच्या मार्फत अभिनंदन व कौतुक करण्यात आले .



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!