रिपब्लिकन भारत दिनांक 26/07/2025
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशन च्या वतीने डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा दर वर्षी प्रत्येक विद्यालयांमध्ये घेतली जाते .मुलांच्या मनातील स्पर्धा परीक्षेची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी या परीक्षेचे आयोजन निरा कन्या विद्यालयांमध्ये करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी केले. त्यानंतरगुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला . वैष्णवी माने व दूर्वा रणनवरे या विद्यार्थिनींचा इ ६ वी च्या गटात तालुक्यामध्ये विभागून प्रथम क्रमांक आल्यामुळे त्यांना फाउंडेशनच्या वतीने एक हजार रुपये रोख रक्कम, ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले .तसेच इयत्ता सातवीच्या गटामध्ये सिद्धी जेधे हिचा तृतीय क्रमांक आल्यामुळे रोख रक्कम एक हजार रुपये ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन तसेच सारा शहा हिस उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाल्यामुळे रुपये पाचशे रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .
उत्कृष्ट निबंध लेखनासाठी निसर्गा तांबे, सर्वदा रणनवरे, रेणुका धायगुडे या विद्यार्थिनींना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . फाउंडेशन च्या वतीने दीपक चव्हाण आणि सुरज खोमणे कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले .
विद्यालयातील उपशिक्षिका माया गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!