निरा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीमध्ये केली लोकशाहीची रुजवण....


 
निरा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनीमध्ये केली लोकशाहीची रुजवण....

रिपब्लिकन भारत दिनांक 4/08/2025

निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? मतमोजणी कशी करतात? हाताच्या बोटाला शाई का लावतात आणि एकूण प्रक्रिया कशी असते अनेक प्रश्न शाळेतील विद्यार्थ्यांना पडत असतात . सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष कृती मधून विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कन्या विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया राबवली असल्याची माहिती सौ . लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयाच्या प्राचार्या निर्मला माने यांनी दिली .यावेळी मागील वर्षी इयत्ता नववी मध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनी अनुक्रमे मानमोडे ईश्वरी,पवार हर्षदा, वावरे आदिती, वैभवी भुजबळ  तसेच मागील वर्षीची एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी सांची प्रधान या विद्यार्थिनी विद्यालयाकडून उमेदवारीसाठी पात्र ठरल्या. उमेदवारी जाहीर केल्यानंतर सदर उमेदवारांनी आपापले चिन्ह ठरविले . उमेदवारांनी शालेय वस्तू उदाहरणार्थ शाळेची घंटा, पुस्तक, पेन, फळा, ट्रॉफी या चिन्हासहित आपला उमेदवार परिचय विद्यार्थ्यांना करून दिला .




त्यानंतर सदरच्या विद्यार्थिनींना दोन दिवस स्वतःचा प्रचार करण्यासाठी देण्यात आले . त्यानंतर एक दिवस शांतता काळामध्ये प्रचार बंदी ठेवण्यात आली तर नंतर दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले .प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य अनिल धुमाळ आणि जि . प . प्राथमिक शाळा निरा मुले येथील मुख्याध्यापिका संगीता बालगुडे यांच्या हस्ते ईव्हीएम मशीनचे पूजन घेण्यात आले .

विद्यालयाचे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांच्याकडून मतदानास सुरुवात झाली . त्यानंतर सर्व इयत्तेच्या विद्यार्थिनींनी ईव्हीएम मशीनद्वारे आपल्या इच्छुक उमेदवाराला मतदान केले . 

दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी प्रशासनाच्या देखरेखीखाली सदर मतदानाची मोजणी करण्यात आली व विद्यार्थिनींना मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला .

 यावेळी मान्यवर ग्रामस्थ अश्विनीताई चव्हाण उपस्थित होत्या .शालेय विद्यार्थी प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून वैभवी भुजबळ 133 मताने विजयी झाली तर उपमुख्यमंत्री ईश्वरी मानमोडे ही 103 मतासह उपविजेती  ठरली

तिला विद्यालयाच्या विद्यार्थी संसदेचा उपमुख्यमंत्री होण्याचा मान विद्यालयाकडून देण्यात आला .

निवडुणकीच्या निकालानंतर सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला व फुलांच्या पाकळ्या उधळून आनंद साजरा केला गेला. विजयी विद्यार्थिनींची शाळेच्या मैदानातच ढोल ताशा सह मिरवणूक काढण्यात आली तर नंतर त्या विद्यार्थिनींचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे यांनी अभिनंदन केले .यानंतर उमेदवार विद्यार्थीनींनी या लोकशाही




निवडणूकीबद्दलचे मनोगत व्यक्त केले तसेच मतदार म्हणून इतर विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपापली सकारात्मक मते यावेळी नोंदविली. तत्पूर्वी घेतलेल्या लोकशाही निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या प्रत्येक वर्गातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अशा 24 सदस्यांची विद्यार्थी संसद स्थापन करण्यात आली.विद्यार्थी संसदेमधील विद्यार्थिनींची नावे राजवी पोकळे, राजगौरी टकले, अन्वी कुचेकर, खुशी वाघ, स्वरांजली हुलगे, श्रेया अधटराव, पूर्वा जाधव, आराध्या मोरे, प्राचीन प्रधान, शौर्या धायगुडे, आसावरी बोडरे, वैष्णवी देवाडिगा, राबिया मुलाणी, इशिका वावरे, स्वरा धुमाळ, संस्कृती सूर्यवंशी, कृपा जठार, सई जेधे, धनश्री जाधव, पूजा मोटे, काजल कुमारी, गायत्री माने, अर्पिता जाधव, विशाखा पंडित त्या संसदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे वैभवी भुजबळ आणि मानमोडे ईश्वरी यांची निवड करण्यात आली.सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणुका कशा पार पडतात याचे प्रत्यक्ष अनुभव घेता आले .उपक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

0 Comments