रिपब्लिकन भारत दिनांक 2/08/2025
रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून निरा येथील सौ लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींनी 'गर्ल गाईड 'या विषयाअंतर्गत भारतीय जवानांसाठी स्वतःच्या हाताने राख्या आणि भेटकार्ड बनविले अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी दिली .विद्यालयातील गाईड प्रमुख अश्विनी खोपे, मंगल चव्हाण आणि कलाशिक्षक भास्कर लोमटे यांच्या संकल्पनेतून राखी व भेटकार्ड बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे नियोजन इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनीनी केले. विद्यार्थिनींनी या कार्यशाळेमध्ये उत्साहात सहभाग नोंदवून आपल्यातील कलागुणांना उस्फूर्तपणे वाव दिला आणि नवनिर्मितीचा आनंद लुटला .मुलींनी विविध रंगांची फुले ,मनी, कागदापासून राख्या आणि भेटकार्ड बनवले. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे तसेच इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या .
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!